पाकिस्तानवर कर्फ्यू लावून क्रिकेट खेळण्याची वेळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अतिरेक्यांचा जागतिक अड्डा असलेल्या पाकिस्तानचे क्रिडाविश्वात पुन्हा एकदा पितळ उघडे पडले. दौऱयावर आलेल्या श्रीलंकेविरुद्धची क्रिकेट मालिका कर्फ्यूसदृश वातावरणात खेळविण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. श्रीलंकेच्या 15 क्रिकेटपटूंसाठी सुरक्षा रक्षकांच्या 36 गाडय़ांचा ताफा ठेवावा लागतो यावरूनच पाकिस्तान परदेशी पाहुण्यांसाठी किती बेभरवशाचा देश आहे हे चव्हाटय़ावर आले आहे.

सुरक्षेच्या कारणामुळे श्रीलंकेच्या दहा प्रमुख क्रिकेटपटूंनी पाकिस्तान दौऱयातून माघार घेतली. त्यामुळे श्रीलंकेला ‘ब’ दर्जाचा संघ पाकिस्तान दौऱयावर पाठवावा लागला. ही क्रिकेट मालिका यशस्वी करण्यासाठी पाकिस्तानने श्रीलंकेच्या संघाला राष्ट्रपतींना असणारी झेड दर्जाची सुरक्षा पुरवली आहे. श्रीलंकेच्या खेळाडूंना एवढी कडेकोट सुरक्षा पुरवण्यात आली आहे. त्या सुरक्षेकडे पाहता त्या विभागात पाकिस्तानात दाखल झालेल्या श्रीलंकेच्या 15 खेळाडूंच्या चमूला विमानतळावरून हॉटेलपर्यंत दोन बसमधून तब्बल 36 सुरक्षा रक्षकांच्या गाडय़ांच्या ताफ्यातून नेण्यात आले.