पाकिस्तानची तंतरली म्हणे आमच्याकडेही पर्याय आहे

2040

सामना ऑनलाईन। लाहोर

जम्मू-कश्मीमधून 370 कलम हटवल्यामुळे तिळपापड झालेल्या पाकिस्तानला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अणवस्त्राबाबत दिलेला इशारा चांगलाच झोंबला आहे. भविष्यात अण्वस्त्रांबाबतच्या आमच्या धोरणांतील बदल परिस्थितीवर अवलंबून असतील असा इशारा सिंह त्यांनी पाकिस्तानला दिला आहे. यावर पाकिस्तानी लष्कराचे मेजर जनरल आसिफ गफूर यांनी ज्या पद्धतीने हिंदुस्थान पुढे जात आहे ते पाहता आमच्याकडेही पर्याय आहेत. असा पोकळ इशारा दिला आहे.

मोदी सरकारने जम्मू-कश्मीरमधून 370 कलम हटवल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सातजणांची एक समिती स्थापन केली. या समितीची शनिवारी बैठक झाली. परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरैशी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. यावेळी कुरैशी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं. मोदींनी नेहरुंचा हिंदुस्थान संपवून टाकला. आताची हिंदुस्थानची धोरणे ही ‘डोवाल सिद्धांता’वर अवलंबून आहेत. असे कुरैशी यावेळी म्हणाले. तर पाकिस्तानी लष्कराचे मेजर जनरल आसिफ गफूर यांनी सिंह यांच्या इशाऱ्यावर प्रतिक्रीया देताना कश्मीर एक आण्विक बिंदू असून हिंदुस्थानच्या संरक्षण मंत्र्यांनी त्यावर जे विधान केले त्याकडे जगाने गंभीरपणे पाहण्याची गरज असल्याचे म्हटले. तसेच आमच्याकडेही बरेच पर्याय आहेत ज्यांच्याकडे आम्ही दुर्लक्ष करू शकत नाही असा पोकळ इशाराही त्यांनी यावेळी दिला.

आपली प्रतिक्रिया द्या