चंद्रपूर – गांधीजीच्या पुतळ्याचे दुधाने अभिषेक करत शिवसैनिकांनी केली आंदोलनाची सुरुवात

लखमीपुर घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आणि याच बंदला यशस्वी करण्यासाठी चंद्रपुरातील शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. सर्व शिवसैनिक गांधी चौकात जमा होत महापालिकेसमोरील गांधीजीच्या पुतळ्याचे दुधाने अभिषेक करून आंदोलनाची सुरूवात केली.

यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिर्हे यांच्या नेतृत्वात शहरातून बाईक रॅली काढून, घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. शिवसेनेकडून व्यापाऱ्यांना दुकान बंद करण्याचे आव्हान करण्यात आले. या वेळी जिल्हा प्रमुख संदीप गिर्हे, शहर प्रमुख प्रमोद पाटील, युवासेना जिल्हा प्रमुख निलेश बेलखेडे, शिवसेना तालुका प्रमुख संतोष नरुले, युवासेना जिल्हा समनव्यक विक्रांत सहारे, स्वप्नील काशीकर, विनय धोबे, कुसुम ताई उद्गार, निशा ढोंगळे, रोहिणी पाटील, सूचित पिंपलशेंडे, सूरज घोंगे, प्रकाश चंदनखेडे सह हजारो शिवसैनिक आंदोलनात सहभागी झाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या