
गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या ‘लालबागचा राजा’च्या चरणी गणेशोत्सवाच्या काळात भाविकांनी अर्पण केलेल्या सोने आणि चांदीच्या दागिन्यांचा लिलाव करण्यात येणार आहे. हा लिलाव उद्या, गुरुवारी सायंकाळी 5 ते रात्री 10 या वेळेत ‘लालबागचा राजा’ मंडप, लालबाग मार्केट येथे होईल. भाविकांनी मोठ्या संख्येने या लिलावाला उपस्थित राहावे, असे आवाहन ‘लालबागचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.