लालूप्रसाद यादव डिप्रेशनमध्ये

lalu-yadav

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

चारा घोटाळय़ात तुरुंगवासाची सजा भोगत असलेले राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव हे ‘डिप्रेशन’मध्ये गेले आहेत. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रांची येथील ‘रिम्स’ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

लालूप्रसाद हे डिप्रेशनमध्ये गेल्याची माहिती ‘रिम्स’चे संचालक आर. के. श्रीवास्तव यांनी स्वतः पत्रकार परिषदेत दिली. लालूंना उच्च रक्तदाब आणि डिप्रेशनचा त्रास असल्याचे त्यांनी सांगितले.