
सामना ऑनलाईन । रांची
चारा घोटाळय़ात शिक्षा झालेले राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांची देवघर कोषागार प्रकरणातील साडेतीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सात वर्षांपर्यंत वाढविण्यात यावी, अशी विनंती सीबीआयने झारखंड उच्च न्यायालयाला केली आहे. देवघर कोषागार प्रकरणातील इतर दोषींना विशेष सीबीआय न्यायालयाने 6 जानेवारीला सात वर्षांच्या तुरुंगवासाची सजा दिली आहे.
























































