
संघवाल्याना आमच्या अजेंड्यानुसार नाचवत राहू, असं राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव म्हणाले आहेत. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने जातीय जनगणना करण्याची घोषणा केली आहे. यावरच आपली प्रतिक्रिया देताना X वर पोस्ट करत ते असं म्हणाले आहेत.
लालूप्रसाद यादव म्हणाले आहेत की, “मी जनता दलाचा राष्ट्रीय अध्यक्ष असताना 1996-97 मध्ये दिल्लीतील आमच्या संयुक्त आघाडी सरकारने 2001 च्या जनगणनेत जातीय जनगणना करण्याचा निर्णय मंत्रिमंडळातून घेतला होता, जो नंतर एनडीएच्या वाजपेयी सरकारने लागू केला नाही. 2011 मध्ये आम्ही पुन्हा संसदेत जातीय जनगणनेची जोरदार मागणी केली. देशातील पहिले जातीय सर्वेक्षण आमच्या 17 महिन्यांच्या महाआघाडी सरकारच्या काळात बिहारमध्येही करण्यात आले. जातीय जनगणनेची मागणी केल्याबद्दल आम्हाला जातीयवादी म्हणणाऱ्यांना योग्य उत्तर मिळाले. आम्ही या संघवाल्याना आमच्या अजेंड्यावर नाचवत राहू.”