आता जनता वोटबंदी करेल, लालू प्रसाद यादव यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पाटणा

चारा घोटाळ्यात पुरते अडकलेले राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी ट्विटरवरून प्रचार सुरू ठेवला असून सरकारावर टीका केली आहे. नोटाबंदी आणि रोजगार बंदीनंतर आता जनता कमळाच्या चिन्हाची वोटबंदी करेल, अशा शब्दात लालूप्रसाद यादव यांनी सरकारला लक्ष्य केले आहे. आपल्या अधिकृत ट्विटर हँडलच्या माध्यमातून ट्वीट करत त्यांनी ही टीका केली आहे.

नरेंद्र मोदी सरकारने नोटाबंदी केली आणि सोबत रोजगारबंदीही केली. त्यामुळे देशातल्या तरुणांची सोचबंदी झाली आहे. म्हणून आता जनता वोटबंदी करणार असल्याचं त्यांना आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. चारा घोटाळ्याप्रकरणी दोषी असल्याने शिक्षा झालेले लालू प्रसाद यादव सध्या प्रकृतिअस्वास्थ्यामुळे रांची येथील रिम्स रुग्णालयात दाखल आहेत.

दुसरीकडे, लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबामध्ये सध्या सगळं काही आलबेल नसून त्यांचे पुत्र तेजप्रताप यादव यांनी नवीन पक्ष स्थापन करण्याचा इशारा दिला आहे. लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी आपल्या वर्तुळातील सदस्यांना उमेदवारी देण्याची मागणी तेज प्रताप यांनी पक्षाकडे केली आहे. या प्रकरणी राजदकडून निर्णय येणं अद्याप बाकी आहे.