लम्पीने 260 जनावरांचे मृत्यू; केवळ 86 प्रस्ताव मंजूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लम्पी स्कीन संसर्गामुळे मृत्यू झालेल्या जनावरांपोटी शासनाकडून 30, तर जिल्हा परिषदेकडून 10 हजार अशी सुमारे 40 हजारांची मदत दिली जाते. जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 271 जनावरांचा मृत्यू झाला आहे. मात्र, मृत जनावरांपोटी अर्थसाहाय्य मिळवण्यासाठी आतापर्यंत वासरू, गाय व बैलाचे अवघे 86 प्रस्ताव दाखल झाले आहेत. जिल्हा परिषद यंत्रणेकडून प्रस्ताव दाखल करण्याची प्रक्रिया धिम्या गतीने होत असल्याने मदत पोहचण्यास विलंब होत आहे.

जिह्यात लम्पीचा फैलाव झपाटय़ाने होत असून, दिवसेंदिवस जनावरांच्या मृत्यूचा आकडाही झपाटय़ाने वाढत आहे. शासनाकडून मृत पशुधनापोटी अर्थसाहाय्य दिले जाते. त्यानुसार शासनाकडून प्रतिगाय मृत्यू 30 हजार व जिल्हा परिषदेकडून 10 हजार तसेच बैल मृत झाल्यास 25 हजार, तर प्रतिवासरू 16 हजार रुपये अनुदान निश्चित आहे. लम्पीमुळे मृत जनावराचा प्रस्ताव पंचनामा करून पशुधन अधिकाऱयांमार्फत तालुका पशुसंवर्धन अधिकाऱयांकडे प्रस्ताव पाठवला जातो. त्यानंतर हा प्रस्ताव पुढे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांकडे पाठवला जातो.

तेथेही छाननी करून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अध्यक्ष असलेल्या समितीसमोर प्रस्ताव ठेवला जातो. आतापर्यंत या समितीसमोर दाखल झालेले 86 प्रस्ताव मंजूर झाले आहेत. दाखल प्रस्ताव व मृत जनावरांचा आकडा यात मोठी तफावत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रस्ताव सादर करण्यास गती देण्याचे आव्हान मुख्य कार्यकारी अधिकाऱयांसह जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्यासमोर आहे.

असा आहे 1 कोटीचा हिशेब

z 50 लाखांची औषधे दरकरारानुसार सुमारे सात ते आठ कंपन्यांकडून खरेदी केली. 10 लाखांची औषध खरेदी दरकराराव्यतिरिक्त झाली. तसेच, अधिग्रहित 28 वाहनांचे डिझेलसाठी 5 लाख ठेवले. मृत पशुधनाच्या विल्हेवाटीसाठी 2 लाख 80 हजार, निडलसाठी 2 लाख 10 हजार, खासगी लसीकरण मानधन प्रतिलस पाचप्रमाणे 16 लाख 75 हजार, तर 5 लाख 25 हजार लस मात्रा खरेदीवर खर्चाचे नियोजन प्रशासनाने मांडले.

मृत जनावरांच्या तुलनेत प्रस्ताव

z अर्थसाहाय्य मिळण्यासाठी समितीसमोर 61 गाई, 13 बैल व 12 वासरे असा एकूण 86 जनावरांचा प्रस्ताव दाखल झाला होता. या प्रस्तावाला मुख्य कार्यकारी अधिकारी आशीष येरेकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मंजुरी दिली असून, यापोटी एकूण 23 लाख 47 हजार रुपयांचे अर्थसाहाय्य ट्रेझरीत जमा झाले आहे.

आतापर्यंत बाधित जनावरांचा आकडा 5466

z जिह्यात 208 गावांत 5 हजार 466 जनावरांना लम्पीची बाधा झाल्याचे निदान झाले आहे. त्यापैकी 3 हजार 121 जनावरे बरी झाली आहेत. आतापर्यंत 13 लाख 5 हजार 306 जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले असून, 271 पशुधनाचा मृत्यू झाला आहे.