
कोकणात गेले 2 दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे भुईबावडा घाटात बुधवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली. दरड कोसळल्याने या घाटातील वाहतूक पूर्णत: ठप्प झाली आहे. दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरड कोसळल्याने खारेपाटण गगनबावडा या मार्गावरील वाहतूक बंद झाली असून या मार्गावरील वाहतूक करुळ घाटमार्गे वळवण्यात आली आहे. दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.


























































