
देशातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) संबंधित कौशल्यांची मागणी सातत्याने वाढत आहे, असे ‘इंडीड’च्या ताज्या आकडेवारीतून समोर आले आहे. सप्टेंबर महिन्यात हिंदुस्थानातील एकूण नोकरी जाहिरातींपैकी 11.7 टक्के जाहिरातींमध्ये एआयचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला होता. तीन महिन्यांपूर्वी हे प्रमाण 10.6 टक्के तर वर्षभरापूर्वी 8.2 टक्के होते. आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी संबंधित संधी मुख्यत्वे तंत्रज्ञान क्षेत्रात केंद्रित असल्या तरी आता त्या झपाटय़ाने विविध उद्योगांमध्ये विस्तारत आहेत. डेटा आणि ऍनालिटिक्स क्षेत्रातील सुमारे 39 टक्के पदांमध्ये एआयच्या कौशल्यांचा उल्लेख आहे. तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी संबंधित कौशल्यांची मागणी विविध अभियांत्रिकी शाखांमध्येही सामान्य होत चालली आहे.
            
		





































    
    






















