लतादीदींची प्रकृती स्थिर, अफवा पसरवू नका!

1018

‘गानसम्राज्ञी’ लता मंगेशकर यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे सोमवारी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल केले. लतादीदींची प्रकृती चिंताजनक असली तरी औषधोपचारानंतर स्थिर आहे. लतादीदींच्या तब्येतीबाबत कोणतीही अपवा पसरवू नका अथवा चुकीची माहिती शेअर करू नका. त्यांच्या चांगल्या तब्येतीची प्रार्थना करा, असे त्यांच्या तब्येतीवर नजर ठेवून असणाऱ्या जवळच्या व्यक्तींनी एएनआयशी बोलताना सांगितले.

90 वर्षीय लतादीदींवर ब्रीच कॅण्डी रुग्णालयात डॉ. पतित समधानी उपचार करीत आहेत. दीदींच्या प्रकृतीबाबत रुग्णालयाच्या वतीने कोणतेही मेडिकल बुलेटिन देण्यात आलेले नाही मात्र मंगेशकर कुटुंबीयांच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार छातीत दुखू लागल्याने तसेच जंतुसंसर्ग झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गायिका असल्याने त्यांच्या फुप्फुसांची क्षमता चांगली आहे. त्यामुळेच यातून लवकर बरे होण्यास मदत झाली. त्यांना काही काळ व्हेंटिलेटरवरही ठेवले होते. दीदींची भाची रचना खडीकर-शाह यांनी दीदींची प्रकृती चांगली असून त्यांना लवकरच डिस्चार्ज मिळेल असे सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या