लातूर जिल्ह्यात 34 पॉझिटिव्ह, 10 जणांचे अहवाल अनिर्णित

579

लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत लातूर जिल्ह्यातील 184 जणांचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. एकशे चाळीस जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून ३४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर १० जणांचे अहवाल अनिर्णीत आले आहेत. लातूर जिल्ह्यातील वाढत जाणारी कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सर्वांची चिंता वाढवणारी ठरत आहेत. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकय विज्ञान संस्थेत घेण्यात आलेल्या एकूण 50 व्यक्तींचे स्वॅब पैकी 36 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून 10 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 04 व्यक्तींचे अहवाल अनिर्णित आले आहेत अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे सहयोगी प्राध्यापक डॉ. नामदेव सूर्यवंशी यांनी दिली.

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील रुग्णालयात सद्यस्थितीत एकूण 48 कोविड 19 पॉझिटिव्ह रुग्ण दाखल असुन त्यापैकी 26 रुग्ण कोरोना विलगीकरण कक्षात दाखल असून सद्यस्थितीत त्यांची प्रकृती स्थिर आहे. तसेच 22 रुग्ण कोरोना अतिदक्षता विभागात असून त्यापैकी 07 रुग्णाची प्रकृती गंभीर आहे व उर्वरीत रुग्णांची प्रकृती सद्यस्थितीत ठीक आहे. या रुग्णालयातील 04 रूग्णांची प्रकृती पूर्णपणे बरी झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले. त्यापैकी एक रुग्ण 12 दिवस व्हेंटिलेटरवर होता व त्या रुग्णास मधुमेह हा आजार होता व उर्वरीत 02 रुग्ण 05 दिवस व्हेंटिलेटरवर वर होते त्यांना इतर आजार नव्हते अशी माहिती कोरोना विलगीकारण कक्षाचे प्रमुख डॉ. राम मुंढे यांनी दिली. औसा तालुक्यातील 17 रुग्णांचा समावेश यामध्ये असून अमदपुर तालुक्यातील तीन तर उदगीर तालुक्यातील रुग्णांचा समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या