
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये आजपर्यंत तब्बल 38 उमेदवारी अर्जांची विक्री करण्यात आली आहे. मात्र, अजून कोणीही उमेदवारी अर्ज दाखल केलेले नाही. 27 सप्टेंबरपासून विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी उमेदवारी अर्ज विक्री करण्यास सुरुवात झाली आहे. लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये तब्बल 38 उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे.
बालकिशन आडसुळे यांनी स्वतःसाठी व बसपा उमेदवार म्हणून 2 अर्ज घेतले आहेत. बी.जी. दहीफळे यांनी भाजपाच्या रमेश कराड यांच्यासाठी 2 अर्ज घेतले आहेत. बाळासाहेब शिवाजी शिंदे यांनी राष्ट्रीय मराठा पक्षासाठी 1 अर्ज घेतला आहे. ढोबळे तुकाराम सोपान यांनी भारीप बहुजन महासंघ आघाडीसाठी 2 अर्ज घेतले आहेत. राजकुमार मारोती गडगळे यांनी अपक्ष म्हणून 2 अर्ज घेतले आहेत. बाजीराम दत्तू एकुरके यांनी अपक्ष म्हणून 2 अर्ज घेतले आहेत. आकनगिरे श्रीनिवास अंगदराव यांनी वंचित आघाडीकडून अर्ज घेतला आहे. तसेच अपक्ष म्हणूनही अर्ज घेतलेला आहे. विकास कोंडीबा शिंदे, तुकाराम नागेराव धावारे, रविकांत उध्दवराव तांबारे, वंगाटे सुरज प्रेमनाथ, क्षीरसागर मंचक व्यंकटराव , शशीकांत नानासाहेब हांडे यांनी अपक्ष म्हणून अर्ज घेतले आहेत. पडिले दगडूसाहेब व्यंकटराव यांनी लोकजागर पार्टीकडून, शेळके रुपेश शामराव स्वतंत्र भारत पक्षाकडून, अत्तार जलील यासीन बहुजन मुक्ती पार्टी, विरकर सोमनाथ रामदास बहूजन मुक्ती पार्टी, अरविंद महादेव गाडे, विलास त्रिंबक बचाटे, झेटे बालकिशन प्रभू यांनी अपक्ष म्हणून तर राजकुमार व्यंकटराव कलमे यांनी भाजपाकडून, झेटे किरण विठ्ठलराव यांनी अपक्ष गुंगे अरुण बापूराव बसपा, भोपणीकर विशाल मारुतीराव बसपा, चामे अभिजीत राम भाजपा, गोजमगुंडे निरज तुकाराम भाजपा, पडिले दिपक दगडूसाहेब लोकजागर पार्टी, बावणे दत्ता संपतराव भाजपा, खोसे नारायण बालासाहेब अपक्ष, शेख साजिद रहिम एआयएमआयएम, माने सुधाकर नागोराव अपक्ष, पेदाटे दिलीप व्यंकटराव भाजपा, ओहळ पदमाकर कोंडीबा अपक्ष, मुंडे मधूकर त्रिंबकराव यांनी श्रीमती विमल आकनगिरे यांच्यासाठी बहुजन क्रांती दलासाठी, योगेश व्यंकटराव देशमुख यांनी अपक्ष म्हणून अर्ज खरेदी केला आहे.

































































