
लातूर येथील बसस्थानकामध्ये उदगीर आगाराच्या चालकास दोघांनी मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
यासंदर्भात मदास हाणमंत कासले चालक उदगीर आगार यांनी दिलेल्या तक्रारीत नमुद केले आहे की, महेश शिवाजी मांदळे रा. नळगीर व त्यांचा साथीदार रा. डोंगरशेळकी या दोघांनी फिर्यादीला तु विनावाहकाची गाडी पॉईंटरवर का लावलास म्हणून चालक मदास कासले यास शिवीगाळ करून लाथाबुक्क्याने मारहाण केली. कपडे फाडले शासकीय कामात अडथळा आणला व दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी राठोड करीत आहेत.


























































