Latur Accident लग्नाहून परतताना कारचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील चौघांनी गमावले प्राण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लातूर जिल्ह्यातील औसा-निलंगा मार्गावर सोमवारी सकाळी सातच्या सुमारास कारचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. यामुळे हळहळ व्यक्ती केली जात आहे.

प्राथमिक माहितीनुसार, निलंगा येथील दत्तनगर भागातील रविहासी सचिन बडूरकर हे नातेवाईकांच्या मुलाचा लग्न समारंभ आटोपून पुण्याहून आपल्या कुटुंबासह घरी परतत होते. सकाळी सातच्या सुमारास औसा तालुक्यातील उत्का पाटीजवळ नियंत्रण सुटल्याने कार पलटी झाली. या भीषण अपघातामध्ये अमर सचिन बडूरकर (वय – 15), जय सचिन बडूरकर (वय – 10), अंश किरण बडूरकर (वय – 10) आणि प्रकाश लक्ष्मण कांबळे (वय – 27) हे जागीच ठार झाले.

सचिन बडूरकर (वय – 50), त्यांची पत्नी गोदावरी उर्फ सारिका बडूरकर (वय – 45), मुलगी जान्हवी बडूरकर (वय – 10) आणि यश किरण बडूरकर (वय – 14) हे जखमी झाले असून त्यांना लातूर येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले.