
लातूर येथील सर्वे नं. 258/1 मधील गुंठेवारी नियमाधीन प्रमाणपत्राचे बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी अनिल राजाराम बेळंबे (रा. छत्रपती संभाजीनगर) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लातूर येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गोविंद मारूती मचकटे प्रभारी दुय्यम निबंधक यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, अनिल राजाराम बेळंबे रा. छत्रपती संभाजीनगर यांनी दस्त क्रमांक 3418/2018 या दस्ताची नोंदणी करून मौजे लातूर येथे सर्वे नं. 258/1 मधील गुंठेवारी नियमाधीन प्रमाणपत्र क्र. एमसी/टीपी/8/186/20089 दिनांक 25 जुलै 2008ची बनावट कागदपत्रे तयार केली. ती कागदपत्रे खरी आहेत म्हणून दस्त नोंदणीसाठी वापरण्यात आली. बनावट कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक निळकंठे हे करीत आहेत.


























































