नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे भामटा जेरबंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। लातूर

उदगीर येथे मोटारसायकलवरून महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र पळवणाऱ्या भामट्यास नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याचा साथीदार मात्र मोटारसायकलसह फरार होण्यात यशस्वी झाला.

उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात यासंदर्भात शालिनी श्रीकांत महेंद्रकर यांनी तक्रार दाखल केली. फिर्यादी आणि तिची जाऊ अशा दोघीजणी दोऱ्याचे रिळ आणण्यासाठी उदगीर येथील कृष्णकांत चौकात पायी जात असताना सायकलवर बसून आलेल्या मुलांनी तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले. दोघींनी आरडाओरड केल्याने त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या काही लोकांनी पाठलाग करून एकास पकडले. तर दुसरा साथीदार मात्र मोटारसायकलवर पळून गेला. संतोष वैजनाथ पवार रा. गोपाळ नगर उदगीर असे पकडलेल्या युवकाचे नाव होते. तर त्याचा साथीदार मानिक कल्लुरे रा. अशोक नगर उदगीर असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मोटारसायक ही माणिक कल्लुरे याची असल्याचे त्यांनी सांगितले.