धनादेश अनादर प्रकरणी सहा महिन्याचा सश्रम कारावास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लातूर

लातूर येथील केदारनाथ अर्बन को-ऑप बँकेस दिलेला धनादेश न वटल्या प्रकरणी येथील अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी यांनी माणिक गणपती आष्टुरे यास सहा महिने सश्रम कारावास व नुकसान भरपाई म्हणून १ लाख ७५ हजार रुपये एक महिन्यात देण्याचा आदेश दिला आहे.

माणिक गणपती आष्टुरे रा. सताळा ता. उदगीर यांनी केदारनाथ को-ऑप बँक लि.लातूर यांच्याकडून किराणा दुकानाच्या व्यवसायासाठी व इतर कारणासाठी २ लाख रुपयाचे कर्ज घेतले होते. मात्र कर्जाची रक्कम व हप्ते भरण्यात आले नाहीत. त्यामुळे बँकेस १ लाख ७५ हजार रुपयाचे धनादेश माणिक गणपती आष्टुरे यांनी दिलेले होते. परंतु सदरील धनादेश वटला नसल्याने सदरील प्रकरण न्यायालयात दाखल करण्यात आले. अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी (कोर्ट ६) श्रीमती सुनिता डी. कनकनवाडी यांनी साक्षी पुराव्यावरुन सहा महिने सश्रम कारावास व नुकसान भरपाई म्हणून १ लाख ७५ हजार रुपये एक महिन्याच्या आत द्यावेत. ही रक्कम न दिल्यास तीन महिने अधिक शिक्षा भोगावी लागेल, असा आदेश दिला. बँकेच्या वतीने विधीज्ञ राजेंद्र सुधाकर निटूरकर यांनी काम पाहीले.