
सामना प्रतिनिधी। लातूर
महापूर शिवारात शेळ्यांना चारण्याचे काम करणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यास चाबकाने, बेल्टने, काठीने बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी चारजणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेहरूनगर तांडा येथील रहिवाशी असणारा पिडीत मुलगा हा शिवाजी महाविद्यालय रेणापूर येथे १२ वी शिकत आहे. तो घरातील शेळीला चारण्यासाठी महापूर शिवारातील शेतात घेऊन गेला होता. त्यावेळी तिथे असलेल्या रवी युवराज कुरे याने त्याला थम्सअप पिण्यास दिले. ते पिल्यानंतर त्यामध्ये दारु असल्याचे विद्यार्थ्याच्या लक्षात आले. त्यानंतर रवी कुरे आणि त्याच्या सोबत आलेल्या उध्दव नरसींग ढमाले, गजू नरसींग ढमाले, गणेश दिून ढमाले यांनी चाबकाने, काठीने, बेल्टने मारहाण केली, जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
































































