लातूरच्या व्यापाऱ्याला पश्चिम बंगालच्या सोने कारागिरीनं फसवलं, 76 लाखांचा माल घेऊन लंपास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लातूर शहरातील सोने-चांदीच्या व्यापाऱ्यास पश्चिम बंगाल मधील कारागिरानं 76 लाखांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकास माधवराव चामे (रा. पापविनाश रोड, लातूर) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

विकास चामे हे सोने-चांदीचे व्यापारी आहेत. त्यांनी सोन्याचे काम करणारा कारागीर बिनोद सुधीर जाना (रा.पश्चीम बंगाल) याच्याकडे 1463 ग्रॅम ७७० मिली ग्रॅम सोने घडवण्यासाठी दिले होते. या सोन्याची किंमत 76 लाख 26 हाजर 444 रुपये आहे. मात्र हे सोने घेऊन कारागिरीने पळ काढला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच विकास यांनी पोलिसात धाव घेतली. गांधी चौक पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कव्हाळे हे करीत आहेत.