Latur Crime News – सावरी येथे भुरट्या चोरट्याने मंदिराचा कळस आणि घंटीवर मारला डल्ला, नागरिकांमध्ये संताप

निलंगा तालुक्यातील मौजे सावरी (झोपडपट्टी) येथे भुरट्या चोरट्याने श्री बिरुदेव मंदिरातील घंटा व लक्ष्मी मंदिराचा कळस चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. चोरांना पकडून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

सदर घटना बुधवारी (3 डिसेंबर 2025) रोजी मध्यरात्री घडली असून अज्ञात चोराने एकूण 4,700 रुपये किंमतीची सांस्कृतिक मालमत्ता लंपास केली आहे. यामध्ये सावरी येथील ग्रामदैवत बिरुदेव मंदिराची पवित्र घंटा व लक्षमी मंदिराचा कळस याचा समावेश आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना आहे. नागरिकांनी पोलिसांविरोधात रोष व्यक्त केला आहे.

गावात रात्रीच्या वेळी पेट्रोलींगची गाडी फिरत नाही, तसेच पोलीस प्रशानाचा चोरांवर वचक राहीलेला नाही. त्यामुळे घरे, दुकाने तर सोडा आता चक्क दैवतांचे मंदिर सुद्धा भुरटे चोरं सोडत नाहीत तेथील चक्क घंटा, कळस तसेच गल्ले यावर डल्ला मारण्याईतपत चोरांची मजल गेलेली आहे. तसेच प्रशासन मात्र तक्रार आली की, शोध सुरुच असल्याचे सांगतात मात्र चोरांवर पकडुन कारवाई मात्र करत नाहीत, त्यामुळे नागरीकांच्या माध्यमातून प्रशासनावर संशय व्यक्त करत आहे. या घटनेविषयी औराद पोलीस ठाण्याचे तपासिक पोलीस उपनिरीक्षक मारुती कच्छवे यांच्याकडे संपर्क साधला असता तपास सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.