
आशिव ते उजनी दरम्यान दोन ट्रॅव्हल्स भीषण अपघात झाला असून त्यात एका व्यक्तीचा जागेवर मृत्यू तर आठ गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना लातूरला पाठवण्यात आले.
गुरुवारी सकाळी साडेपाच वाजता हा अपघात झाला. अपघातावेळी एक ट्रॅव्हल रस्त्यावरून फरफटत रस्त्याखाली गेली. यामध्ये एक अभिनव तर दुसरी कृष्णा ट्रॅव्हल्स असून दोन्ही ट्रॅव्हल्स मुंबई ते उदगीर धावतात अशी माहिती मिळाली आहे.