
सामना प्रतिनिधी। वलांडी
बलात्कार पीडित बालिकेचा गर्भपात केल्याप्रकरणी देवणी तालुक्याचे तत्कालिन पोलीस निरीक्षक कृष्णदेव सोमाजी पाटील यांना अटक करण्यात आली आहे. तालूक्यातील तळेगाव ( भोगेश्वर ) व विळेगाव येथील एका ऊसतोड कामगाराने एका बालिकेवर बलात्कार केला होता. त्या बालिकेला पोलीस ठाण्यातच गोळ्या देऊन तिचा गर्भपात केल्याप्रकरणी पाटील यांना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणी कृष्णदेव पाटील यांना सहआरोपी करून त्यांच्यावर बाललैंगिक अत्याचार कायदा पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

































































