
तामिळनाडू येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती. त्या अनुषंगाने गुरुवारी लातूर जिल्ह्यातील मुरुड येथील भीमसैनिकांनी कडकडीत बंद ठेवला होता.
या बंदला येथील व्यापाऱ्यांनी व समाजातील सर्व नागरिकांनी पाठिंबा दर्शवित व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. त्याच अनुषंगाने मुरुड येथे निषेध रॅली काढत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. बंद ठेवण्यात आलेले असताना मुरुड येथे चौकाचौकांमध्ये शोकाकुल पसरला होता.

































































