
गार्डन पाईप पाहिजे असे सांगून माल खरेदी करून रक्कम क्युआर कोडच्या माध्यमातून पाठवण्याच्या बहान्याने तब्बल 47472 रुपयांना दोघांना फसवण्यात आल्याची घटना घडली. चाकूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यात गोपाळ ज्ञानोबा जक्कलवाड यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, धर्मसिंग नावाने एकाने मोबाईलवरून फोन करून गाईन पाईप मिळतात का अशी विचारणा केली. 18250 रुपयांचे बील मोबाईलवर पाठवण्यास सांगीतले. त्यानंतर पुन्हा दुसऱ्या मोबाईलवरुन फोन आला आणि रक्कम तुम्हाला पाठवण्यासाठी क्युआर कोड पाठवण्यास सांगीतले.
एक रुपया पाठवण्यास सांगीतल्यामुळे एक रुपया पाठवला परंतु, त्यांनी क्युआर कोडच्या माध्यमातून 36500 फिर्यादीच्या खात्यातून रक्कम ट्रान्सफर करून घेतली. त्यानंतर पुन्हा 22222 रुपये काढून घेण्यात आले. एकूण 40472 रुपयांची फसवणूक करण्यात आली.
त्याचप्रमाणे फिर्यादीचा मित्र शेख वाजीद अजमसाब याच्याखात्यामधूनही क्युआर कोडच्या माध्यमातूनच 5000 आणि 2000 असे एकूण 7 हजार रुपये काढून घेऊन फसवणूक करण्यात आली. दोघांचीही फसवणूक करणारा व्यक्ती एकच होता. चाकूर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.





























































