
लातूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच हवामान खात्याने शनिवारी (27 सप्टेंबर 2025) पावसाचा रेड अलर्ड जारी केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षततेसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
हवमान खात्याने दिलेल्या पावसाच्या रेड अलर्टमुळे खबरदारीचा उपाय म्हणून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी लातूर जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. अंगणवाडी, सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा, अनुदानित व विना अनुदानिक शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालय, खाजगी शिकवणी तसेच आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्थांना दि. 27 सप्टेंबर, 2025 रोजी सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे.