अतनूर येथे घरफोडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। लातूर

जळकोट तालुक्यातील अतनूर येथे चोरट्यांनी दोन घरे फोडून सुमारे 54 हजार रुपये चोरुन नेले. याप्रकरणी जळकोट पोलीस ठाण्यात दिगंबर माधवराव सूर्यवंशी रा. अतनूर यांनी तक्रार दाखल केली.

अज्ञात चोरट्यांनी सूर्यवंशी यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील पेटीत ठेवलेले रोख 50 हजार रुपये चोरले. त्याचप्रमाणे फिर्यादीच्या शेजारच्या घराचेही कुलूप तोडून चोरट्यांनी तेथील रोख 4 हजार रुपये चोरुन नेले. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस कर्मचारी पवार हे करीत आहे.