जितेंद्र आव्हाडांना बिष्णोई गँगची धमकी, केली खंडणीची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना लॉरेन्स बिष्णोई गँगने धमकी दिली आहे. बिष्णोई गँगने आव्हाड यांच्याकडे खंडणीची मागणी केली असून मराठी वृत्तवाहिन्यांनी याबाबत वृत्त दिले आहे.

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील घराबाहेर गोळीबाराचे प्रकरण ताजे असताना जितेंद्र आव्हाडही बिष्णोई गँगच्या रडारवर असल्याचे समोर आले आहे. बिष्णोई गँगने आव्हाड यांना फोनवरून धमकी देत लाखो रुपयांची खंडणी मागितली आहे. पैसे न दिल्यास सलमान खानसारखे प्रकरण करण्याची धमकी देण्यात आली आहे. रोहित गोदारा नावाच्या व्यक्तीने ऑस्ट्रेलियावरून हा फोन केल्याची माहिती मिळत आहे.