छपाक चित्रपटाच्या निर्मात्यांवर नाराज आहे लक्ष्मी अगरवाल, वाचा काय आहे कारण

अॅसिड हल्ल्यातील पीडित लक्ष्मी अगरवाल हिच्या जीवनावर आधारित छपाक या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये अॅसिड हल्ला, त्यानंतरचे लक्ष्मीचे आयुष्य, होरपळल्याने तिचा बदललेला चेहरा पाहताना अक्षरश: अंगावर काटा उभा राहतो. दीपिकाचा अभिनय व तिला केलेला प्रोस्थेटिक मेकअपने सर्वांचे मन जिंकले आहे. त्यामुळे सध्या सर्वच जण या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

एकिकडे चित्रपटासाठी चांगले वातावरण निर्माण झालेले असताना हा चित्रपट देखील वादात अडकण्याची शक्यता आहे. हा चित्रपट जिच्या आयुष्यावर आधारित आहे ती अॅसिड हल्ल्यातील पीडिता लक्ष्मी अगरवाल ही चित्रपटाच्या निर्मात्यांवर नाराज असल्याचे समजते. लक्ष्मी व निर्मात्यांमध्ये सध्या लक्ष्मीला दिलेल्या पैशांवरून वाद सुरू आहे.

लक्ष्मीला या चित्रपटाचे हक्क मिळविण्यासाठी निर्मात्यांनी 13 लाख रुपये दिले होते. मात्र लक्ष्मीला ही रक्कम फार कमी वाटत असल्याने तिने ही रक्कम वाढवून द्यावी अशी मागणी केली आहे. मात्र जेव्हा लक्ष्मीला 13 लाख रुपये देण्यात येतील असे सांगण्यात आले होते तेव्हा ती खूष होती, असे चित्रपटाच्या प्रोडक्शन टीम कडून समजते. तर हा चित्रपट कोट्यवधींमध्ये कमाई करणार आहे मग मला इतकी कमी रक्कम का? असा सवाल लक्ष्मीकडून केला जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या