विधान परिषद निवडणुकीतील लढतींचे चित्र आज स्पष्ट होणार; पुण्यात शिंदे गटाची माघार? 110 उमेदवारांचे अर्ज बाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
vidhan bhavan mumbai

विधान परिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांतील निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची उद्या, शुक्रवारी शेवटची मुदत आहे. या मुदतीनंतर विधान परिषद निवडणूक लढतींचे चित्र स्पष्ट होईल. पुणे शिक्षक मतदारसंघात भाजप आणि शिंदे गटाने उमेदवार दिले आहेत. भाजपच्या उमेदवारांच्या नावांवर थेट नवी दिल्लीतून शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे या मतदारसंघात शिंदे गट माघार घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

विधान परिषदेच्या पुणे, नागपूर, संभाजीनगर पदवीधर तसेच पुणे आणि अमरावती मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी येत्या 23 ऑक्टोबर रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत महायुतीत बंडखोरी झाली आहे.

विधान परिषदेच्या पाच जागांच्या निवडणुकीसाठी एकूण 365 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. या अर्जांची बुधवारी छाननी करण्यात आली. छाननीत 110 उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातील सूत्रांनी दिली.

मतदारसंघनिहाय मतदान केंद्राची संख्या

पुणे पदवीधर    741

नागपूर पदवीधर 445

संभाजीनगर पदवीधर  842

पुणे शिक्षक        310

अमरावती शिक्षक  81