
जंगलभ्रमती करीत असलेल्या एका बिबटयाचा मृतदेह विहीरीत आढळल्याने खळबळ माजली आहे. चंद्रपूरातील हातून जिल्ह्यातील मूल तालुक्यात सोमनाथ येथील आमटे फार्म परिसरामध्ये ही घटना घडली आहे.
मूल तालुक्यतील बफर क्षेत्र असलेल्या सोमनाथ आमटे फार्म परिसरालगत मोठे जंगल आहे. या परिसरात मोठया प्रमाणात वन्यप्राण्यांचा वावर आहे. सोमनाथ आमटे फार्म परिसरातील एका खाजगी शेतात बिबट्या फिरत असताना विहीरीत पडल्याची घटना घडली आहे. विहीरीत बिबट्याचा मृतदेह असल्याची माहिती वनविभागाला मिळताच वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला आहे.

































































