कोपरगावात बिबट्याचा मुक्त संचार; दोन शेळ्या फस्त

331

कोपरगाव परिसरात बिबट्याचा मुक्तसंचार सुरू असून चव्हाण वस्तीवर दोन शेळ्या बिबट्याने फस्त केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाच्या सुस्त कारभरामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. कोपरगाव तालुक्यातील जेऊर पाटोदा येथे गुरुवारी दुपारी चव्हाण वस्तीवरील शेळ्यांच्या कळपावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शरद चव्हाण व सुधाकर चव्हाण या भावांच्या दोन शेळ्या मारल्या गेल्याने त्यांचे 14 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

कोपरगाव परीसरात बिबट्याचा मुक्त संचार सुरू असून काही दिवसांपूर्वी या भागात जयराम चव्हाण यांना बिबट्या दिसला होता. आतापर्यंत बिबट्याने तालुक्यात सात शेळ्या मारल्या आहेत. पाळीव कुत्रे गायब होत असून बाहेर उघड्यावरील बांधलेल्या जनावरांची शेतकऱ्यांना धास्ती वाटत आहे. वनविभागाने तातडीने या परीसरात पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनू केली आहे. पिंजरा लावा, पंचनामे तातडीने करा, याची वनविभागाकडून दखल घेतली जात नाही. वनविभागाच्या सुस्तपणामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या