मालवणातील मसुरेत भरवस्तीत दिसला बिबट्या; परिसरात दहशत

436

मालवणातील मसुरे येथे भर वस्तीत घराच्या दारात शनिवारी रात्री बिबट्या दिसल्याने परिसरात घबराट पसरली आहे. अनेक दिवस या भागात बिबट्याचा वावर आहे. रात्री भरवस्तीत फिरून बिबट्याने शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांचा फडशा पाडला आहे. शनिवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर यांच्या घरासमोर बिबट्या दिसला. त्यांच्या गाडी जवळ बिबट्या उभा होता. आरडाओरडा करताच बिबट्याने भरतगड किल्याच्या दिशेने धूम ठोकली. बिबट्याच्या सततच्या वावरामुळे परिसरात घबराट पसरली आहे. वन विभागाने त्वरित दखल घेत बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या