Video – ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेच्या सेटवर बिबट्याची एन्ट्री, कलाकार; क्रू मेंबरची पाचावर धारण

मुंबईतील गोरेगाव फिल्म सिटी येथील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेच्या सेटवर चक्क बिबट्याने एन्ट्री केली. मालिकेच्या सेटवर बिबट्या आल्याने कलाकारांसह क्रू मेंबरची पाचावर धारण बसली. याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दरम्यान, ही घटना बुधवारी घडली. बिबट्या आला तेव्हा सेटवर 200 हून अधिक लोक उपस्थित होते. एखाद्याला जीव गमवावा लागला असता. गेल्या 10 दिवसांत अशी ही तिसरी किंवा चौथी घटना आहे. सरकार यावर ठोस उपाययोजना करत नाही, असे ‘ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन’चे अध्यक्ष सुरेश श्यामलाल गुप्ता माध्यमांशी बोलताना म्हणाले.