भुंकणाऱ्या कुत्र्यांचा सैन्याने असा केला बंदोबस्त, वाचा सविस्तर

18

सामना ऑनलाईन, पुणे

हिंदुस्थानी लष्कराने पाकव्याप्त कश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केला होता. पाकिस्तानच्या हद्दीत घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी मोठी कामगिरी बजावली होती. या सर्जिकल स्ट्राईकमध्ये असंख्य आव्हानं होती, सगळ्यात मोठं आव्हान होतं ते म्हणजे भुंकणाऱ्या कुत्र्यांचं. हे कुत्रे भुंकले असते तर दहशतवाद्यांना आणि पाकिस्तानी सैनिकांना कळालं असतं की काहीतरी गडबड आहे. या कुत्र्यांना आपल्या जवानांनी अजिबात ओरडू दिलं नाही, असं निंभोरकर यांनी पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना सांगितलं.

कुत्रे बिबट्यांना घाबरतात. हे जवानांना चांगल्या पद्धतीने माहिती होतं. यामुळे जवानांनी त्यांच्यासोबत बिबट्याचं मूत्र घेतलं होतं. कुत्र्यांना बिबट्याच्या मूत्राचा वास आल्याने त्यांना बिबट्या आला असावा असं वाटत होतं. यामुळे त्यांनी भुंकण्याची हिम्मत केली नाही. पाकिस्तानी लष्कराने हिंदुस्थानी जवानांच्या केलेल्या हत्येचा बदला घेण्यासाठी हिंदुस्थानी लष्कराने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त केले होते. हिंदुस्थानी लष्कराच्या इतिहासात ही एक अत्यंत महत्वाची कारवाई मानली जाते.

आपली प्रतिक्रिया द्या