‘लश्कर’चा मोस्ट वॉटेंड दहशतवादी आसिफ ठार, हिंदुस्थानला मोठं यश

1644
army_jawan
प्रातिनिधिक फोटो

जम्मू-कश्मीरच्या सोपोर भागात सुरक्षादलाच्या जवानांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. विशेष म्हणजे ठार करण्यात आलेला आसिफ हा लश्कर-ए-तोयबाचा मोस्ट वॉटेंड दहशतवादी होता. काही दिवसांपूर्वी आसिफने केलेल्या गोळीबारात एका स्थानिक फळ विक्रेत्याच्या कुटुंबातील तीन जण जखमी झाले होते.

सोपोरच्या या भागात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षाजवानांना बुधवारी पहाटे मिळाली होती. त्यानंतर सुरक्षादलाच्या जवानांनी ही कारवाई केली. पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ‘एका क्रूर हल्ल्यात दहशतवाद्यांनी सोपोरच्या डंगरपोरा भागात एका मुलीसहित चार लोकांवर गोळीबार केला होता. ज्यामध्ये ते सर्व जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे’.

आयईएएनएस या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार 1 जानेवारी ते 29 ऑगस्ट पर्यंत हिंदुस्थानच्या लष्कराने 139 दहशतवाद्यांना ठार केलं आहे. यामध्ये नियंत्रण रेषेजवळ झालेल्या चकमकीत ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचा देखील समावेश करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या