
भारतीय आयुर्विमा महामंडळात (एलआयसी) सहाय्यक पदांच्या परीक्षेसाठी ज्या उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज केलेले आहेत त्यांच्यासाठी भारतीय आयुर्विमा महामंडळ स्थानीय लोकाधिकार समितीच्या वतीने भरतीपूर्व प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले आहे. 9 ते 16 ऑक्टोबरपर्यंत सायंकाळी 6 ते 8 या वेळेत तज्ञ शिक्षकांकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे.
त्याचा लाभ जास्तीत जास्त मराठी तरुण-तरुणींनी घ्यावा असे आवाहन आयुर्विमा महामंडळ स्थानीय लोकाधिकार समितीचे सरचिटणीस गोपाळ शेलार यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी नरीमन पॉइंट येथील भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या ‘योगक्षेम’ या इमारतीच्या दुसऱया मजल्यावरील स्थानीय लोकाधिकार समिती व भारतीय विमा कर्मचारी सेनेच्या कार्यालयात सकाळी 11 ते 5 या वेळेत संपर्क साधावा.



























































