एलआयसीची आर्थिक स्थिती मजबूत!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
lic-logo

एलआयसी व सर्वसामान्य माणूस यांचे जिव्हाळ्याचे नाते असून एलआयसीची आर्थिक स्थिती चांगली आहे. मात्र व्हॉट्स अॅप, फेसबुक तसेच अन्य सोशल नेटवर्पवर चुकीचा प्रचार केला जात असल्याचा आरोप एलआयसीच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. या चुकीच्या माहितीवर ग्राहकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहनदेखील करण्यात आले आहे.

एलआयसीच्या पॉलिसीज भक्कम असून 2018-19 या आर्थिक वर्षात पॉलिसीधारकांना पाच हजार कोटींचा बोनस जाहीर करण्यात आला. हा बोनस सर्वाधिक असून यापुढेदेखील ग्राहकांचे हित जपण्यात येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. या वर्षीचा 31 ऑक्टोबरपर्यंत एलआयसीचा पॉलिसी बाजारातील वाटा 72.84 टक्के होता. ग्राहकांच्या सर्व पॉलिसीज सुरक्षित आहेत, असेही अधिकाऱयांनी म्हटले आहे.