LIC Jeevan Akshay Policy – एक हप्ता देऊन दरमहा 14 हजार रुपये पेन्शन मिळवू शकता…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भारतीय जीवन विमा महामंडळ (एलआयसी) ही देशातील अशा काही कंपन्यांपैकी एक आहे ज्यांची विमा पॉलिसी सर्वाधिक विकली जाते. सरकारद्वारे संचालित या कंपनीत गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्व लोक बिनधास्तपणे गुंतवणूक करतात. अलीकडेच कंपनीने आपली अतिशय लोकप्रिय बंद झालेली पॉलिसी पुन्हा सुरू केली आहे.

या पॉलिसीचे नाव ‘जीवन अक्षय’ असं आहे. ही कंपनीची सर्वाधिक विक्री झालेली पोलीस आहे. पॉलिसीधारक दरमहा एक रक्कमी गुंतवणूक करून दरमहा पेन्शन मिळवू शकतात. या पॉलिसीची खास गोष्ट म्हणजे पॉलिसी घेताना पॉलिसीधारकास आयुष्यभर किती पेन्शन मिळते याबाबत आधीच माहिती देण्यात येते.

या पॉलिसीमध्ये पेन्शन मिळण्यासाठी चार पर्याय आहेत. वार्षिक, सहामाही, तिमाही आणि मासिक. यात किमान दीड लाख रुपयांची गुंतवणूक करता येऊ शकते. यात आपल्याला पेन्शनवर आयकर 80 सी अंतर्गत कर आकारला जातो. हे एक नॉन-लिंक्ड पॉलिसी आहे म्हणजेच याचा शेअर बाजाराशी काहीही संबंध नाही.

ही पोलीस 30 ते 85 वर्षीय कोणीही व्यक्ती खरेदी करू शकतात. या पॉलिसीत गुंतवणूकीची कोणतीही मर्यादा नाही. आपण आपल्या क्षमते प्रमाणे यात गुंतवणूक करू शकतात. पॉलिसी जारी झाल्यापासून तीन महिन्यांनंतर कर्जाची सुविधादेखील याद्वारे मिळू शकते. तसेच एका कुटुंबातील कोणतेही दोन सदस्य संयुक्तपणे ही पॉलिसी घेऊ शकतात. यात पेन्शन मिळवण्यासाठी 10 वेगवेगळे पर्याय आहेत.

त्वरित पेन्शन मिळविण्यासाठी ‘Annuity Payable for Life at a Uniform Rate’ पर्याय आपण निवडू शकता. हा पर्याय निवडल्यानंतर गुंतवणूकीच्या नंतर लगेचच दरमहा पेन्शन सुविधा सुरु होईल. ही पॉलिसी घेताना सर्व नियम व अटी व्यवस्थित वाचून आणि समजून घ्या.