तलावात पोहायला गेला गुप्तांगात घुसला जळू, क्लिष्ट शस्त्रक्रियेनंतर जळू काढण्यात यश

एक तरुण पोहायला गेला तेव्हा त्याच्या गुप्तांगात जळू कीडा घुसला होता. त्यामुळे या तरुणाला खूप वेदना होत होत्या. अखेर क्लिष्ट शस्त्रक्रियेनंतर हा जळू काढण्यात आला आणि तरुणासह डॉक्टरांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

कंबोडिया देशात एक तरुण तलावात पोहायला गेला होता. तेव्हा एक जळू त्याच्या गुप्तांगात घुसला. जळू नावाचा कीडा हा प्राण्याचे रक्त शोषून जिवंत राहतो. हा जळू तरुणाच्या गुप्तांगात घुसल्यानंतर त्याला खूप वेदना होत होत्या. शौचालयाला गेल्यावर त्याला अधिकच त्रास होता. जेव्हा डॉक्टरांनी तरुणाच्या गुप्तांगात कॅमेरा घालून पाहिले तेव्हा त्यांना धक्काच बसला. एक जळू तरुणाच्या पोटात चिकटून बसला होता. अखेर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून त्या जळूला मारले आणि त्याला बाहेर काढले. जेव्हा हा जळू तरुणाच्या गुप्तांगात गेला तेव्हा तो छोटा होता. पण तरुणाच्या शरीरात गेल्यावर त्याने खूप रक्त शोषले होते. तेव्हा तो आकाराने मोठाही झाला होता. या पावसाळ्याच्या वातावरणात पूर्ण कपडे घालून पोहायला जा असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. त्यामुळे अशा घटना टाळता येईल असेही त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या