
लेफ्टनंट जनरल बी. एस. राजू यांची नवे उपलष्करप्रमुख म्हणून नियुक्ती झाली आहे. ते सध्या मिलिटरी ऑपरेशन्सचे महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. आर्मी कमांडर नसलेल्या अधिकाऱयाची उपलष्करप्रमुख पदावर नियुक्ती होण्याची ही पहिलीच वेळ आहे. ते 1 मे रोजी पदभार स्वीकारणार आहेत. 1984 मध्ये लष्करात दाखल झाल्यानंतर त्यांनी लष्कराची प्रतिमा उंचावण्यासाठी अनेक कौतुकास्पद कामे केली. त्यांचा उत्तम युद्ध सेवा, अतिविशिष्ट सेवा, युद्ध सेवा, विशिष्ट सेवा अशा विविध पदकांनी गौरव झाला आहे.


























































