तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून खून केल्याप्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहारमध्ये एका नराधमाने तीन वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करून तिचा खून केला होता. दोन वर्ष चाललेल्या खटल्यानंतर त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
2 जून 2018 रोजी बिहारच्या समस्तीपूर भागात एक तीन वर्षाची मुलगी आपल्या भावासोबत खेळत होती. तेव्हा रामलाल महतो याने तिला निर्जन ठिकाणी नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. तसेच अतिशय क्रूर पद्धतीने तिला मारून टाकले. मुलगी हरवली म्हणून तिच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. दुसर्‍या दिवशी पीडित मुलीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली.
चार दिवसांनंतर आरोपी रामलाल महतोला पोलिसांनी शोधून काढले. त्याच्यावर पोस्को अंतर्गत कारवाई करून त्याला अटक करण्यात आली. दोन वर्ष त्याच्या खटला सुरू होता. अखेर आज न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली आहे.