अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी आरोपीला सक्तमजुरी

491

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपीला दोषी ठरवत येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.व्ही.देशपांडे यांनी त्याला 12 वर्षांची सक्तमजुरी व 36 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. आरोपीचे नाव सविन बाळु साळवे (वय.26 वर्षे, रा. सुपा, ता.पारनेर, जि.नगर) असे आहे. जून 2018 मध्ये पिडीत मुलगी ही वाळवणे, ता.पारनेर येथे इयत्ता 10 वी मध्ये शिकत होती. घटनेच्या वेळी पिडीत मुलीचे वय 14 वर्षे होते. घटनेपूर्वी आरोपी व पिडीत मुलगी यांची ओळख होती.

पिडीत मुलगी नेहमीप्रमाणे सकाळी शाळेत गेली असताना शाळा सुरू होण्यापुर्वी आरोपी मुलीच्या शाळेत गेला आणि पिडीतेला मोटारसायकलने पारनेरला घेऊन गेला. पारनेर येथे आरोपीने पिडीतेला एका लॉजवर नेऊन शारीरिक अत्याचार केला. त्यानंतर आरोपीने पिडीतेला पुन्हा दुसर्‍या लॉजवर नेले व तेथे दोन दिवस ठेऊन शारीरिक अत्याचार केला. त्यानंतर आरोपी पिडीतेला घेऊन त्याच्या मावशीच्या घरी गेला व तेथे एक दिवस मुक्काम केला. त्यानंतर आरोपी हा पिडीतेला पानोली घाटातून घेऊन जात असताना त्यांना एकाने पाहिले व त्यांना सुपा पोलीसांच्या ताब्यात दिले.

29 जून 20018 रोजी पिडीत मुलीचे आई-वडील कामावर गेले होते. त्यांना मुलगी शाळेत उपस्थित नसल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तिचा शोध घेतला. मात्र, ती सापडली नाही. त्यामुळे पिडीतेच्या मुलीच्या आईने सुपा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलीस याचा तपास करत असताना 04 जुलै 2018 रोजी एकाने आरोपी व पिडीत मुलीला सुपा पोलीस ठाण्यात हजर केल्यानंतर पोलिसांनी पिडीत मुलीचा जबाब नोंदविला आणि आरोपीला अटक केली. त्यानंतर पोलिसांनी साक्षीदारांचे जबाब नोंदविले. पिडीत मुलीची वैद्यकिय तपासणी केली. तसेच घटनास्थळाचे पंचनामे केले. गुन्हयाचा पोलीस उपनिरीक्षक पठाण व पोलीस उपनिरीक्षक संजयकुमार सोने यांनी तपास करून न्यायालयात आरोपीविरूध्द आरोपपत्र दाखल केले. खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश क्रमाक 3 मध्ये श्रीमती एम.व्ही. देशपांडे यांच्यासमोर झाली. आरोपीला अटक केल्यापासून तो तुरुंगातच आहे. या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील एस.के.पाटील व अतिरीक्त सरकारी वकील अर्जुन पवार यांनी काम पाहिले. तर सरकार पक्षाच्या वतीने एकुण 15 साक्षीदार तपासण्यात आले. खटल्यामध्ये पिडीत मुलीची साक्ष, वैद्यकीय अधिकारी डो.प्रतिभा दिघे व डॉ. एम.पी.उंदरे, शाळेचे मुख्याध्यापक, ग्रामविकास अधिकारी व तपासी अंमलदार यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या.

दोन्ही बाजूचे म्हणणे एकून घेत आरोपीला सजा सुनावण्यात आली. आरोपीला दोषी ठरवत त्याला पीस्कोनुसार 12 वर्षे सक्तमजुरी व 12,000 रूपये दंड आणि व भा.द.वि.का.कलम 376 (2)(एन) अन्वये 12 वर्षे सक्तमजुरी व 12,000 रूपये दंड, 343 प्रमाणे 2 वर्ष सक्तमजुरी व 2,000/- रूपये दंड, 363 प्रमाणे 3 वर्षे सक्तमजुरी व 3,000/- रूपये दंड, 366-अ प्रमाणे 7 वर्षे सक्तमजुरी व 7,000/- रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली. एकूण 12 वर्षांची सक्तमजुरी व 36 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या