
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
कर्नाटक येथून पंचवीस जणांचा एक समुह देवदर्शनासाठी गणपतीपुळे येथे आला होता. त्यापैकी तिघांना समुद्रात पोहण्याचे मोह झाला. ते तिघे समुद्रात पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे गटांगळ्या खाऊ लागले. आपण बुडत आहोत याची जाणीव होताच त्यांनी वाचविण्यासाठी आरडाओरड सुरु केली. त्याचक्षणी जीवरक्षकांनी समुद्रात उड्या मारुन तिघांना वाचवले.
राघवेंद्र एम वंगोटी (वय २८ रा.बेळगाव), रफीक जालीहाल (वय ३२ रा.बदामी कर्नाटक), संतोष वायंगोलर (वय २१ रा.बेळगाव कर्नाटक) हे तिघे मंगळवारी दुपारी पावणे दोन वाजता समुद्रात पोहण्यासाठी गेले.समुद्र खवळलेला असल्याने पाण्यात खेचले गेले. ते बुडत असताना किनाऱ्यावरील जीवरक्षकांनी तिघांना समुद्रातून बाहेर काढले.
जीवरक्षक अनिकेत राजवाडकर, रोहित चव्हाण,विक्रम राजवाडकर,अनिकेत मयेकर, उमेश म्हादये, ओंकार गावणकर, विशाल निंबरे, अनिकेत चव्हाण मयुरेश्वर देवरुखकर,अक्षय माने उमेश म्हाद्ये,व प्रमोद डोर्लेकर यांनी पाण्यात उड्या मारून तिघांना सुखरूप पाण्याच्या बाहेर काढले. यावेळी पोलीस कर्मचारी सागर गिरीगोसावी, योगिता नाटुस्कर, होमगार्ड संदेश धावडे, रोहित निबंरे मदत कार्यात सहभागी झाले.


























































