उन्हाळ्यातील त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी, वापरा फक्त 1 चमचा मध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
मधुमेह असणाऱयांनी मध खाऊ नये असा समज असतो. पण असे काही नाही. मधात कार्बोहायड्रेट, कॅलरी आणि अनेक प्रकारची मायक्रो न्यूट्रियंट्स असतात. त्यामुळे शरीरातील साखरेची पातळी स्थिर राहते.

मधामध्ये कॉपर, लोह, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम यासारखी तत्त्वे असतात. यामुळे त्वचेवरील अतिरिक्त मळ निघून जायला मदत होते. यामुळे तजेलदार होऊन नैसर्गिक चमक चेहऱ्यावर येते.

तेलकट त्वचेवर पुरळ येण्याचे प्रमाण जास्त असते. यामुळे चेहऱ्याच्या त्वचेवर डागही पडू शकतात. धूळ आणि प्रदूषणामुळे त्वचेवरील छिद्रे मोकळी होत नाहीत.यामुळे त्वचा टॅन दिसू लागते. अशा प्रकारच्या त्रासांवर मध अतिशय गुणकारी ठरते. तेही फक्त एक चमचा मध त्वचेवर लावल्याने काय फायदे होतात, जाणून घ्या.

तेलकट त्वचेवर मधाचा वापर
एका वाटीत अर्धा चमचा लिंबाचा रस आणि 1 चमचा मध घेऊन मिसळा.त्यानंतर फेसवॉशने चेहरा स्वच्छ धुवा. आता मधाची तयार पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हातांनी मसाज करा.काही वेळाने चेहरा स्वच्छ धुवून टॉवेलने पुसा.

कोरड्या त्वचेसाठी
कोरड्या त्वचेसाठी आपण हनी मास्कचा वापर करू शकता. मधामध्ये मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात, जे त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यास मदत करतात, म्हणूनच कोणत्याही क्रीमऐवजी आपण स्किन केअर रुटीनमध्ये मधाचा समावेश करू शकता.

कोरड्या त्वचेसाठी मधाचा करा फेसमास्क
एका वाटीत 1 पिकलेलं केळ घ्या, त्याला मॅश करून त्यात 1चमचा मध आणि 1 चमचा लिंबाचा रस घाला.साहित्य मिसळल्यानंतर ही तयार पेस्ट चेहऱ्यावर लावा.पेस्ट चेहऱ्यावर लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवून घ्या.15 मिनिटानंतर चेहरा पाण्याने धुवून घ्या.या पेस्टचा वापर महिन्यातून 3 वेळा करू शकता.

चमकदार चेहऱ्याकरिता

स्किनवर ग्लो आणण्यासाठी आपण मधाचा वापर करू शकता. चेहऱ्यावर मधाचा वापर केल्याने त्वचा एक्सफोलिएट होते. एका वाटीत 1 चमचा मध, 2 चमचे बेसन, साखर आणि पाणी मिसळून पेस्ट तयार करा.हे तयार स्क्रब चेहऱ्यावर लावा.त्वचेवर हाताने मसाज करा आणि 15 मिनिटानंतर चेहरा पाण्याने धुवा.या स्क्रबमुळे ब्लॅकहेड्स व चेहऱ्यावरील इतर समस्या दूर होतात.