उन्हाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या ‘या’ चटणीची रेसिपी जाणून घ्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नारळामध्ये अँण्टीऑक्सिडंट गुणधर्म असतात. रोजच्या जेवणात नारळाचा (खोबऱ्याचा) समावेश केल्यास शरीरातील आयर्नची कमतरता भरून निघते. उन्हाळ्याच्या दिवसांत नारळ पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारक्षमता वाढायला मदत होते. यासोबतच या दिवसांत दही खाल्ल्याने शरीराला थंडावा मिळतो. त्यामुळे उन्हाचा दाह शमण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी नारळ-दह्याची चटणी खाल्ल्याने फायदा होतो. खोबऱ्याची किंवा नारळाची चटणी बरेच जण करतात, मात्र या चटणीत दह्याचा समावेश केल्यास ती रुचकर होतेच शिवाय तिच्यातील पौष्टिकताही वाढते. पाहुया या चटणीची रेसिपी.

साहित्य

अर्धा कप नारळाचा किस (किसलेलं खोबरे), 4 चमचे भाजलेली चण्याची डाळ, 4 चमचे दह, अर्धा इंच आल्याचा तुकडा, 2 हिरव्या मिरच्या, 10ते12 कढीपत्त्याची पाने, 1चमचा मोहरी, चिमूटभर हिंग, चवीनुसार मीठ, फोडणीसाठी तेल आणि आवश्यक तेवढं पाणी

कृती

सर्वप्रथम एका दही घेऊन ते व्यवस्थित फेटा. त्यानंतर खोबरं, चणा डाळ,आलं, हिरवी मिरची, मीठ यामध्ये आवश्यक तेवढं पाणी घाला. हे मिश्रण मिक्सरमधून वाटून घ्या. त्यानंतर या वाटलेल्या चटणीत दही घाला. हे मिश्रण व्यवस्थित एकजीव होईपर्यंत ढवळा. आता फोडणीकरिता गॅसवर भांड ठेवा. त्यामध्ये तेल घाला. त्यामध्ये हिंग, कढीपत्ता, मोहरी घालून फोडणी तयार करा. मोहरी तडतडली की, चटणी या फोडणीत घाला. दही-खोबरं चटणी. तयार ही पौष्टिक चटणी डोसा, इडली या पदार्थांसोबत खाऊ शकता.