हिवाळ्यात सांधेदुखीने त्रस्त आहात? त्वरित आरामाकरिता सुरू करा ‘हे’ 5 उपाय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सांधेदुखीची समस्या हिवाळ्यात बळावते. गार वारा, थंडी यामुळे शरीरातील सांधू दुखतात. याकरिता त्वरित आरामाकरिता तेल, मलम लावले जाते, मात्र या दिवसांत होणारी ही सांधेदुखी कायमची दूर होण्याकरिता काही सोपे आणि घरगुती उपाय आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले आहेत. ते नियमित केले तर आपली सांधेदुखीच्या समस्येपासून कायमची सुटका होऊ शकते.

हिवाळ्यात सांधेदुखीची समस्या टाळण्यासाठी तंदुरुस्त राहणे आवश्यक आहे. याकरिता आळस सोडून नियमित व्यायामालाही महत्त्व द्यायला हवे. यासोबत शरीराचे पोश्चर आणि अति जड व्यायाम करणेही टाळणे गरजेचे आहे.

सांधेदुखीचा त्रास होत असेल तर धूम्रपान पूर्णपणे टाळा. धूम्रपानामुळे तणाव वाढतो. यामुळे अर्थरायटिसच्या वेदनांमध्ये वाढ होण्याची शक्यता बळावते.

हिवाळ्याच्या दिवसांत आहाराबाबत विशेष काळजी घेणे महत्त्वाचे आहे. सांधेदुखीचा त्रास टाळण्यासाठी आहारात भाज्या, फळे, मासे, सुकामेवा आणि बियांचा समावेश करावा. दररोज सकाळच्या कोवळ्या उन्हात फिरायला जावे. याशिवाय डॉक्टरांच्या सल्ल्याने जीवनसत्त्व डी सप्लिमेंट्ससुद्धा घेऊ शकता.

सांधेदुखीच्या रूग्णांनी हिवाळ्यात नेहमी उबदार कपडे घालावेत कारण थोडीशी थंड, हवा अंगावर आदळताच तुमचे सांधे दुखू शकतात. विशेषत: शरीराचे ते भाग नेहमी झाकून ठेवा जेथे तुम्हाला जास्त वेदना होत आहेत.

आरोग्य तज्ञ म्हणतात की संधिवात असलेल्या लोकांनी व्यायाम करण्यापूर्वी त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही प्रकारची क्रिया तुमच्या सांध्यांवर दबाव आणू शकते.