
सुंदर दिसण्यासाठी महिला स्वत:बाबत फार दक्ष असतात. त्यात लिपस्टिक हे महिलांचे आवडते मेकअप साधन. त्यात वेगवेगळ्या कंपनीच्या लिपस्टिक बाजारात आल्या आहेत. मात्र ही लिपस्टिक ओठांचे सौंदर्य वाढवण्याबरोबरच आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे लिपस्टिकचा अतिरेक नको.
लिपस्टिकमध्ये अनेक रसायनांचा वापर केलेला असतो हा रंग आरोग्यासाठी धोकादायक असून शकतो. जर तुम्हाला लिपस्टिक लावण्याची आवड असेल तर त्याचे परिणामही लक्षात घ्या. जी तुमच्यासाठी जाणून घेणे अत्यंत महत्वाचे आहे.
लिपस्टिकच्या अतिवापराने हे परिणाम होऊ शकतात
– लिपस्टिकमध्ये वापरली गेलेली रसायने खाद्यपदार्थ खाताना पोटात जातात. जे शरीरासाठी हानिकारक ठरू शकतं.
– कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा त्रासदायकच असतो. त्यामुळे लिपस्टिकच्या अतिवापरमुळे शरीरात शिसे, अॅल्युमिनियम, कॅडमियम, क्रोमियम आणि मॅग्नेशियमना हानी पोहोचवते. त्याच्यामुळे आपल्या मज्जासंस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतात.
– लिपस्टिकमध्ये असलेले अॅल्युमिनियम हे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
– अॅल्युमिनियम या घटकामुळे पोटात व्रण, अर्धांगवायू सारख्या आजारांना आमंत्रण असू शकते.
– लिपस्टिकमध्ये असलेले घटक तुमच्या शरीरातील फॉस्फेट कमी करू शकतात.
– यामध्ये असलेले शिसे स्मरणशक्ती कमी करू शकते
– लिपस्टिकमध्ये असलेले घटक शरीरात गेल्यामुळे चिडचिड वाढू शकते.
– लिपस्टिकमध्ये असलेल्या क्रोमियममुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो.


























































