अंबरनाथमध्ये तिसऱ्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली, १२ विद्यार्थ्यी सुखरुप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । अंबरनाथ

अंबरनाथ नगरपालिकेसमोरील जॉय हब या इमारतीची लिफ्ट तिसऱ्या मजल्यावरून कोसळून तळमजल्यावर आदळली. घटनेआधी लिफ्टमध्ये काही महिला व विद्यार्थी होते. मात्र लिफ्ट तळमजल्यावर आदळण्याआधी तिसऱ्या मजल्यावर अडकल्याने इमारतीमधील नागरिकांनी त्यांची सुटका केली. लिफ्टमधून त्यांना मोठ्या कसरतीने बाहेर काढताच लिफ्ट काही क्षणांतच खाली कोसळली. ही घटना दुपारी घडली.